माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संकल्पना आणि महत्त्व

 प्रस्तावना 

          माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) ही माहीती तंत्रज्ञान (IT) साठी एक विस्तारित संज्ञा आहे जी युनिफाईड कम्युनिकेशन आणि दूरसंचार ( टेलीफोन लाईन्स आणि वायरलेस सिग्नल) आणि संगणक, तसेच आवश्यक एंटरप्राइज सॉफ्टवेअर, मिडलवेअर यांचा एकत्रीकरणावर भर देते. स्टोरेज आणि ऑडिओ- व्हिज्युअल, जे वापरकर्त्यांना माहितीमध्ये प्रवेश करण्यास, संचयित करण्यास, प्रसारित करण्यास, समजण्यास आणि हाताळण्यास सक्षम करतात. 

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संकल्पना  

            शिक्षण क्षेत्रात गेल्या काहि वर्षात झपाट्याने बदल घडून आले. "माहिती तंत्रज्ञान " "संगणक" हे या शतकाचे परवलीचे शब्द ठरले आहेत. संगणकिय क्रांतीचे अविष्कार जीवनात पदोपदी दिसून येत आहेत. संगणकाच्या सहाय्याने जसा ज्ञानाचा महासागर प्राप्त होतो तसेच संपादन केलेले ज्ञान प्रभावीपणे संग्रहित करण्याचे कसबही प्राप्त झाले आहे. रेडिओ, टि. व्ही., इंटरनेट, टेलिकम्यु निकेशन व व्हिडीओ कॉन्फरन्स यांसारख्या माध्यमांद्वारा वितरीत होणाऱ्या माहितीच्या देवाणघेवाणीचे तंत्र म्हणजे माहिती तंत्रविज्ञान. माहिती तंत्रविज्ञान म्हणजे माहिती मिळविणे त्यावर प्रक्रिया करणे, ती साठवणे ती योग्य व्यक्तिला उपलब्ध करुन देणे. 

                एखाद्या विषयावर वा समस्येबाबत सर्वसमावेशक अभ्यास करुन सुसूत्रपणे, व्यवस्थित आणि रचनाबद्ध पद्धतीने मांडणी करुन शास्त्रीय पध्दतीने प्रक्रिया केल्यानंतर तिचे रुपांतर माहिती तंत्रविज्ञानामध्ये होतो. थोडक्यात, प्राप्त माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन करुन त्याचे अर्थनिर्वेचन करण्यासाठी संगणकाधारित जे तंत्रज्ञान वापरले जाते ते माहिती तंत्रविज्ञान होय. माहिती तंत्रज्ञानाचा अर्थ समजून घेतल्यानंतर संप्रेषण तंत्रज्ञानाचा अर्थ समजून घेऊ या. व्यक्ती आपल्या भावना, विचार, अनुभव यांची देवाणघेवाण करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात. एका व्यक्तीने दूरवर राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी जी साधने तयार केली आहेत, ती सर्व संपर्क साधने होय. उदा. टेलिफोन, फॅक्स दूरदर्शन, रेडिओ, संगणक, इंटरनेट इ. थोडक्यात माहितीच्या प्रसारासाठी संप्रेषण साधनांचा वापर करणे म्हणजे संप्रेषण तंत्रविज्ञान होय.

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व्याख्या 

1) ICT म्हणजे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आणि "संप्रेषण करण्यासाठी आणि माहिती तयार करण्या- साठी, प्रसारित करण्यासाठी, संग्रहित करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तां- त्रिक साधनांचा आणि संसाधनांचा विविध संच" म्हणून परिभाषित केले आहे.

2) "आयसीटी हे तंत्रज्ञान आहे जे प्रक्रिया आणि देवाण- घेवाण यासह मानवी गरजा किंवा उद्देश पूर्ण करण्यासाठी माहिती वापरते."





Comments

Popular posts from this blog

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संकल्पना आणि महत्त्व

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संकल्पना आणि महत्त्व